आमच्याबद्दल
नाणेगाव हे नदीकिनारी वसलेले गाव असून नाणेगाव मध्ये शिवस्मारक उभारलेले आहे.
तसेच १९३६ साली संत तुकाराम ह्या चित्रपटाची छायाचित्रण हे दारणा नदीच्या किनारी केले असून त्या चित्रपटाच्या अभंगामध्ये पखवाजवादक हे नाणेगाव चे पूर्वीचे पहिलवान रतनगिर गोसावि हे होते.
श्री.आर.पी.नाईक हे नाशिक जिल्ह्यातील नाणेगाव चे ग्रामपंचायत अधिकारी आहेत.ग्रामपंचायत अधिकारी हे गावपातळीवर ग्रामपंचायतीचा सचिव किंवा मुख्य कार्यकारीअधिकारी म्हणून कार्य करतात. त्याची नेमणूक जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्याद्वारे केली जाते. श्री. आर.पी.नाईक हे गावातील विविधविकासकामांच्या आखणी व अंमलबजावणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. तेग्रामसभेचे सचिव म्हणून कर वसूली, विविध दाखले देणे, बैठकींचे इतिवृत्तलिहिणे, जन्म-मृत्यू नोंदणी, बालविवाह प्रतिबंध, आपत्कालीन समितीचे काम आणिजैवविविधता समितीचे सचिव म्हणूनही कार्य करतात. तसेच हे शासनाच्यायोजनांची अंमलबजावणी करण्यात मदत करतात आणि आर्थिक व्यवहारांचे नियंत्रणकरतात. आर.पी.नाईक हे गावातील लोकांना आरोग्य, शिक्षण, शेती संदर्भातीलसल्ला देतात आणि ग्रामविकास योजनांची माहिती देणारा दुवा आहेत. त्यांच्याकार्यामुळे नाशिक जिल्ह्यात नाणेगावचे ग्रामपंचायत कामकाज सुलभ आणिप्रभावी झाले आहे.
भौगोलिक माहिती
नाणेगाव हे नाशिक तालुक्यात नाशिक जिल्ह्यातील दारणा नदीलगत वसलेले सुंदर गाव आहे . गावाच्या पूर्वेस दारणा नदी प्रवाहित होत असूननदीस बारमाही पाणीपुरवठा असतो . गावाच्या तर पश्चिमेस व दक्षिणेस देवळालीकटक मंडळ आहे उत्तरेस शेवगेदारणागाव लागून आहे नाणेगाव हे गाव नैसर्गिकसाधन संपत्तीने परिपूर्ण असलेले सुजलाम व सुफलाम असे गाव असून येथील पर्जन्यमान १२० ते १३० असे असते .नाणेगाव हे हे नाशिक पासून उत्तर दिशेला३० किलोमीटर अंतरावर असलेले आहे नाणेगावचे भौगोलिक क्षेत्र 631.53 इतकेआहे गावात दुग्ध- पशुपालन व शेती हा मुख्य व्यवसाय असून गहू ,भात, द्राक्ष, बाजरी, पालेभाज्या, कडधान्य यांची लागवड केली जाते.
ग्रामीण जीवन
नाणेगावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. पण त्याचबरोबर पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय व भाजीपाला व्यवसाय करतात. त्याचबरोबर हस्तकला त्यामध्ये मूर्ती बनवणे ,सुतार काम करणारे , अभियंता, असे बरीच लोक आहेत त्यामुळे नाणेगाव ची जीवनशैली ही व राहणीमान हे चांगले आहे.
लोकसंख्या:-
२०११ च्या जणगणनेनुसार
गावाची लोकसंख्या :- ३६६७
एकूण कुटुंब संख्या :-६८०
दारिद्य रेषेखालील कुटुंबसंख्या :-१३४
संस्कृती व चालिरिती
नाणेगावमध्ये पूर्वी लोक नागपंचमी या सणाच्या वेळी शेतातील कामे आवरलेली असायची त्यामुळे सन १९६५ पूर्वी पासून या गावामध्ये अखंड हरीनाम सप्ताह पार पडतो व हे परंपरा अजूनही टिकून आहे.
तसेच सप्ताह मध्ये सामुहिक गीता जयंती पारायण व ज्ञानेश्वरी पारायण केले जाते तसेच रोज पहाटे काकड आरती व सायंकाळी ५ वाजता हरिपाठ , भजन नित्यनियमाने होते.
लोककलाही समाजातील सामान्य लोकांची कला असून, ती पिढ्यानपिढ्या चालत आलेली असतेआणि त्यात नृत्य, संगीत, नाट्य, चित्रकला, हस्तकला अशा विविध कलांचा समावेशअसतो.पारंपरिकलोककला हा शब्द लोककलेचा एक भाग आहे, जो विशेषतः समुदायाच्या सांस्कृतिकपरंपरा, सण-उत्सव आणि धार्मिक श्रद्धांशी जोडलेल्या जुन्या कलाप्रकारांनासूचित करतो.
नाणेगाव मध्ये लोककला लग्न समारंभ, भजन, कीर्तन, संगीतहे पारंपारिकरित्या केले जाते.
आहारसंस्कृती :-
आहार संस्कृती ही एक संज्ञा आहे ज्याचा वापर समकालीन आहार आणि शरीराच्या प्रतिमांवर गंभीर मार्गाने चर्चा करण्यासाठी केला जातो. अशी चिंता आहे की यामुळे शरीराच्या प्रतिमा समस्या, खाण्याचे विकार आणि इतर मानसिक आरोग्य समस्या वाढू शकतात.
नाणेगाव मध्येआहामध्येगहू ,भात, द्राक्ष, बाजरी, पालेभाज्या, कडधान्य यांचा समावेश आहे.
महत्वाची स्थळे
प्रेक्षणीय स्थळे म्हणजे पाहण्यासारखी सुंदर ठिकाणे. यातऐतिहासिक नैसर्गिक ठिकाणे धार्मिक स्थळे आणि जागतिक वारसा स्थळे यांचा समावेश होतो.
नाणेगाव हे गाव दारणा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. दारणा किराणी खूप सुंदर नैसर्गिक सौंदर्य आहे.या नदी काठी ओमकारेश्वर महादेव मंदिर आहे व तुकाराम महाराज मूर्ती हि आहे. त्यामुळे या ठिकाणी सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे. व भाविकांची गर्दी होते.
आसपासची गावे
जवळीची गावे :-
नाणेगावजवळ भगूर, शेवगेदारणा, पळसे, संसरी, शिंदेगाव आहेत.